भाजप प्रचार भोवला,अभियंता वडगावकर वर गुन्हा दाखल

भाजप उमेदवाराचा प्रचार भोवला; अखेर ‘त्या’ महावितरण अभियंत्यावर गुन्हा दाखल.
हिगोली जिल्हह्यांं्ंंंंंंं्ं्ं
महावितरण सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले सत्यनारायण वडगावकर यांनी सेनगाव नगर पंचायत निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर, आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर आज सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सेनगाव नगर पंचायत निवडणूक प्रचारादरम्यान 15 डिसेंबर रोजी सेनगाव महावितरण सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सत्यनारायण वडगावकर यांनी भाजपाचे प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार गजानन घोगरे यांच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. यावर भारतीय मानव अधिकार संघटनेचे मिलींद प्रधान यांनी आक्षेप घेऊन निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याकडे कारवाईची मागणी केली होती.या प्रकरणाची गंभीर दखल घेत हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सखाराम बेले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी अंती सहायक अभियंता वडगावकर यांनी आदर्श आचारसंहिता भंग करून शासकीय पदाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी सखाराम बेले यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सहाय्यक अभियंता वडगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राठोड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *