खेर्ड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
प्रतिनिधी विकास गडधे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक खेर्डा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री हनवते सर हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री खंदारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.सदरील कार्यक्रमात ‘सन्मान महाराष्ट्राच्या लेकीच्या’ या उपक्रमांतर्गत विविध कर्तबगार महिलांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली. मुलींनी ‘धन्य ज्योतिबा फुले,धन्य क्रांतिबा फुले’ व ‘फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का’या गीतांवर नृत्य सादर केले.सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ओव्या राठोड मॅडम, मटके मॅडमनी व मुलींनी सादर केल्या.सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा पोवाडा श्री पाईकराव सर यांनी सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री खंदारे सर, श्री मुलंगे सर, श्री देशपांडे सर ,श्री इढोळे सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली दांडेकर हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री इंगळे सर यांनी तर आभार पाईकराव सर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेतील शिक्षिका राठोड मॅडम व मटके मॅडम यांचा गावकरी महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.