पाच दिवसांनंतर मृतदेह काढला पाण्याबाहेर

इसापूर धरणाच्या काठावरून पाय घसरल्याने २ ९ डिसेंबर रोजी वयोवृद्ध इसम धरणाच्या पाण्यात बुडाला होता . त्याचा मृतदेह रविवारी काढण्यात आला . मयताचे नाव सकरू काळू चव्हाण ( वय ८५ , रा . सावरगाव बंगला ) असे आहे . इसापूर धरणाची पाणीपातळी खोल असल्याने त्या वृद्धाचा मृतदेह सापडत नव्हता . अखेर दिवसांनंतर गोताखोर शमशेर पठाण व पोहेका भारत घ्यार यांच्या परिश्रमामुळे धरणाच्या मृतदेह बाहेर काढण्यात यश आले . सकरू चव्हाण हे २ ९ डिसेंबरपासून घरातून बाहेर गेले , ते घरी परत न त्यांच्या नातेवाइकांनी आल्याने पोलीस ठाण्यात ते हरवल्याची नोंद केली . घटनेच्या पाचव्या दिवशी गोताखोर शमशेर पठाण , पोहेका भारत घ्यार , पोहेका . माधव भडके , डिगंबर मस्के , पाशा पठाण आदींनी शोधकार्य सुरू केले . त्यांचा मृतदेह पाचव्या दिवशी बाहेर काढण्यात यश आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *