पुसेगाव येथे भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त शूरवीरांना मानवंदना.
पुसेगाव येथे भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त महार शूरवीरांना मानवंदना
पुसेगाव – सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे एक जानेवारी रोजी नालंदा बुद्ध विहारच्या प्रांगणात समता सैनिक दलाच्या वतीने शूर वीरांना मानवंदना देण्यात आली. 1 जानेवारी 1818 रोजी रोजी 500 महार यांनी पेशवाईचा अस्त करण्यात महत्वाची कामगिरी केली.त्याच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव येथे 75 फुटी विजय स्तंभ उभा केला. शौर्याचे प्रतिक म्हणून या स्तंभाकडे बघितले जाते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम भेट दिली तेव्हापासून भीमसैनिक त्यांना मानवंदना देण्यासाठी भिमा कोरेगाव येथे जातात.या मानवंदनेच्या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटन राजु ठोके, पुसेगाव येथील भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष परमेश्वर धाबे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ठोके, ग्यानुजी धाबे, पाखराबाई धाबे, यशवंता धाबे, बबन खिल्लारे, विलास धाबे, भिकाजी धाबे, कयाधु खिल्लारे, नारायण मोरे, संजीविनी धाबे, रंजना धाबे, पुष्पाबाई धाबे, मथुराबाई धाबे, लक्ष्मीबाई धाबे,संगीता रहाटे,आत्माराम खिल्लारे,संतोष धाबे,सुरेंद्र धाबे,नंदू धाबे, दिपक धाबे,सुनील बनसोडे,अमर धाबे,नागोराव धाबे तसेच समता सैनिक दलातील सर्व सैनिक उपस्थित होते.