मराठवाडा विदर्भात गारपीटीची शक्यता

: राज्यातील थंडीचा कडका कमी होणार असून पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच उत्तर खान्देश, विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.दरम्यान, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या शहरांत २८ आणि २९ डिसेंबर या दोन दिवशी पाऊस पडण्याचा इशारा (पिवळा इशारा) दिला आहे.ईशान्य भारतात चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे त्याचा परिणाम पश्चिमी चक्रावातावर झाला आहे. या चक्रावातामुळे ईशान्य भारतातील सर्वच राज्यांबरोबर पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेश या राज्याच्या काही भागात सलग तीन दिवस पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यातच उत्तर प्रदेश आणि आसामच्या भागावर दोन चक्रावात सक्रिय आहेत. त्यामुळे थंडी गायब होऊन पाऊस आणि गारपीट वाढणार आहे. राज्याकडे उत्तर भारताकडून थंड वारे वाहत असतात. त्यामुळे थंडी वाढते. मात्र पुढील तीन ते चार दिवस या भागात पाऊस आणि गारपीट होणार आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून, राज्यातील थंडी कमी होऊन पाऊस आणि गारपीट होणार अस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *