प्रहारचे उप अभियंतास साडीचोळी बांगड्या देऊन निषेध आंदोलन
माजलगाव, प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी
परभणी मो. 7218275486.
माजलगाव तालुक्यातील हाकेच्या अंतरावर मनुर ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला गावातील विविध भागातील विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून लाखो रुपयाचा निधी मंजूर केला होता हा निधी गावातील दलित वस्ती मधील नाली बांधकाम, शाळा बांधकाम, सिमेंट रस्ते, समशान भूमी परिसरातील कॉंक्रिटीकरण व गावातील इतर ठिकाणच्या विकासासाठी आला होता हे काम संबंधित एजन्सीने अंदाजपत्रकानुसार केले नसल्याची तक्रार गावातील प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुका उपाध्यक्ष अविनाश ढगे यांनी जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता बीड व माजलगाव उप अभियंता यांना लेखी स्वरूपात निदर्शनास आणून दिले होते पण या कडे जानीव पुर्वक दुर्लक्ष केले त्या अनुषंगाने दिनांक 25/ 8/ 2021 रोजी कार्यकारी अभियंता बीड यांनी जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता माजलगाव यांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते परंतु संबंधित उपअभियंता यांनी चार महीन्यात कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही व अनेक वेळा निवेदने देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वेळ मारुन नेण्याचे काम केले व संबंधित बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बीड यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे त्याच निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दिनांक 24/ 12 /2021 रोजी गांधीगिरी मार्गाने संबंधित अधिकाऱ्याच्या खुर्चीला साडी, चोळी, बांगड्या देऊन निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष गोपाळ पैंजणे , संपर्कप्रमुख भारत डोंगरे, युवक तालुका उपाध्यक्ष अविनाश ढगे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते