आ. संतोष बांगर साहेब यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन मौजे दाती येथे 33 केव्ही सबस्टेशन उभारण्याची केली मागणी
आज हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी मुंबई येथे राज्याचे ऊर्जामंत्री श्री नितीन राऊत साहेब यांची भेट घेऊन कळमनूरी मतदारसंघातील मौजे दाती येथे नवीन 33 केव्ही सब स्टेशन उभारण्याची मागणी केली तसेच वीज बिला अभावी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची विनंती आमदार बांगर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब यांच्याकडे केली वारंगा येथील सर्वात जुने असलेल्या सब स्टेशन वर ओव्हर लोड होत असल्याने वारंगा व शेवाळा परिसरातील शेतकऱ्यांना दिवसाला फक्त पाच तासच वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी बांधवांची विजे अभावी मोठी अडचण होऊन शेतीचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी बांधवांनी मौजे दाती येथे नवीन 33 केव्ही सब स्टेशन उभारण्यासंदर्भात कळमनुरी मतदार संघाचे कार्य तत्पर आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्याकडे मागणी केली होती शेतकऱ्यां प्रति प्रचंड कळवळा असणारे संवेदनशील मनाचे कार्यतत्पर आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी अधिवेशन काळात आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत राज्याचे ऊर्जामंत्री श्री नितीन राऊत साहेब यांची भेट घेऊन कळमनूरी मतदारसंघातील मौजे दाती येथे नवीन सब स्टेशन लवकरात लवकर उभारण्याची मागणी केली यावेळी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील व युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम हे उपस्थित होते. मौजे दाती येथे 33 केव्ही सब स्टेशन उभारल्यास वारंगा सर्कल व शेवाळा सर्कल मधील मौजे कान्हेगाव, चिखली, पिंपरी, फुटाणा या गावांसह परिसरातील इतर अनेक गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर साहेबांचे मनोमन आभार मानले आहेत