युवासेना तालूकाप्रमुख पदी पुरूषोत्तम सोळंके तर शहर प्रमुख पदी अजित शिनगारे यांची निवड

शिवसेनेच्या युवासेना धारूर तालूकाप्रमुख पदी युवा नेतृत्व पुरुषोत्तम सोळंके यांची तसेच शहरप्रमुख पदी अजित शिनगारे यांची निवड जाहीर झाली आहे.नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात फेरबदल होत असुन धारूर तालूक्याती नवनिर्वाचीत युवासेना कार्यकारणी जाहीर झाली आहे.यात धारूर चे युवा नेतृत्व कट्टर शिवसैनिक पुरूषोत्तम सोळंके यांची निवड झाली आहे पुरूषोत्तम सोळंके यांचे संघटन कौशल्य, सामाजीक कार्य, मोठा जनाधार पाहता त्यांची निवड युवासेना तालूकाप्रमुख पदी झाली आहे. तर शहरप्रमुख पदी अजित शिनगारे यांची निवड करण्यात आली आहे. यांच्या निवडीचा फायदा शिवसेनेला धारूर शहर, तालुका तसेच ग्रामीण भागातील पक्ष बांधणीसाठी होईल.तसेच युवासेना शहर प्रमुख पदी धारूर शहरातील उगवते नेतृत्व कट्टर शिवसैनिक अजित शिनगारे यांची निवड करण्यात आली आहे.असुन निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना यूवा वर्गात असून.पुरूष उत्तम सोळंके व अजित शिनगारे यांच्या निवडी मुळे यूवा वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आहे या दोघांच्या निवडीचे सर्व स्तरातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे.