आ बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी शहराचा विकास होत आहे गटनेते जुनेद भाई दुर्रानी

सन्माननीय आ. बाबाजानी दुर्राणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विकासकामध्ये अजून एक भर पडली असून, आज नूर नगर येथे सीसी रोड व नाली या विकासकामाचे उदघाटन गट नेते जुनेद भैया दुर्राणी यांच्या हस्ते करण्यात आले.सदरील कार्यक्रमासाठी श्री. अनिलभाऊ नखाते(सभापती कृ. उ. बा. पाथरी ), श्री.दादासाहेब टेंगसे(जिल्हा परिषद सभापती, परभणी ), श्री. चक्रधर उगले(समता परिषद जिल्हाध्यक्ष ), श्री. एकनाथराव शिंदे(तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस , पाथरी ), श्री. माधवराव जोगदंड(माजी सभापती कृ. उ. बा. पाथरी ), श्री. गंगाधरराव गायकवाड(जेष्ठ नेते रा. कॉ. पाथरी ), श्री. सदाशिराव थोरात (सभापती पं. स. पाथरी ), श्री. मुंजाभाऊ नाना टाकळकर , यांसह अध्यक्ष श्री.नितेश भोरे, उपाध्यक्ष श्री.हन्नान खान दुर्राणी , बांधकाम सभापती गोविंद हारकळ, तसेच सर्वसन्माननीय नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नूर नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी दादाराव गवारे, मुस्तफा टेलर, शेख मुश्ताक यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी मो. 7218275486.

Leave a Reply

Your email address will not be published.