सकल मराठा समाजाच्या वतीने सेनगांव तहसीलदारांना निवेदन सादर.
सकल मराठा समाजाच्या वतीने सेनगांव तहसीलदारांना निवेदन सादर.अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर कर्नाटक राज्यात बंगळूर या ठिकाणी शाही फेकून विटंबना करण्यात आली असल्याने आज सेनगांव शहरात या घटनेचा जाहीर निषेध करत शिवप्रेमींनी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले असुन आरोपीवर तात्काळ कारवाई न झाल्यास लवकरात लवकर सेनगांव बंद ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सांगण्यात आले आहे.या निवेदनावर मराठा शिवसैनिक सेनेचे शहराध्यक्ष महादेव हरण,शेतकरी नेते मारोती गिते व सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.यावेळी घोषणाबाजी करत या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.