नर्सी येथे श्री संत नामदेव महाराज अकॅडमीचे उद्घाटन बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण
नर्सी येथे श्री संत नामदेव महाराज अकॅडमीचे उद्घाटन.
प्रतिनिधि शेख फजल:- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण…नर्सी नामदेवहिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील पोलिस मैदानावर गौतम बुद्ध सेवा भावी ट्रस्टच्या वतीने श्री संत नामदेव महाराज अकॅडमी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नर्सी ठाण्याचे सपोनि सुनील गिरी यांच्या हस्ते ता.२० रोजी करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून नर्सी ठाण्याचे पोउपनि अशोक कांबळे, सरपंच आसिफ खान पठाण, उपसरपंच ज्ञानेश्वर कीर्तनकार, बबन सावंत, सुभेदार संजीव इंगोले,प्रा, प्रकाश पंडित,शाहूराव देशमुख, शाईनखा पठाण, डॉ प्रमोद गंगावणे, पंजाब गायकवाड, मोबीन पठाण, किसन बांगर, कपिल धबडगे, सरजु इंगोले,भास्कर काळे, गोविंद डाळ,अजय काळे आदी उपस्थित होते.येथील पोलिस ठाण्याच्या मैदानावर प्रथमच नर्सीसह परिसरातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौतम बुद्ध सेवा भावी ट्रस्टच्या वतीने श्री संत नामदेव महाराज अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य तसेच पोलिस भरती होण्यासाठी भरतीपूर्व मैदानी व लेखी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.येथील पोलीस ग्राउंडवरील तयार केलेल्या मैदानावरमैदानी प्रशिक्षण हे भारतीय सैन्य दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सुभेदार संजीव इंगोले हे प्रशिक्षण देणार असून येथील पर्यटन केंद्रामध्ये प्रा. प्रकाश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.राजेंन्द्र सरकटे हे विद्यार्थ्यांना लेखी प्रशिक्षण देणार आहेत.