राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती बंद राहणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र सरकार आणि सरपंच परिषदेमधील वाद पेटण्याची शक्यता आहे . वीज बिलं , पाणी पुरवठा योजना अशा अनेक प्रश्नांसंदर्भातले प्रश्न समोर आहेत . राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींना आर्थिक मदत वेळेत केली जात नाही . दुसरीकडे , राज्य सरकारकडून आयसीआयसीआय बँकेत ग्रामपंचायतीचे खाते काढण्याचे सांगितले . मात्र ग्रामीण भागात ही बँक नाही . अशा विविध तक्रारी घेऊन सरपंच परिषदेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या परत एकदा मांडल्या आहे . सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी यावेळी आपल्या मागण्या मांडल्या ग्रामपंचायतीसंदर्भातील मागण्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करून देखील मागण्या मान्य होत नसल्याने राज्यातील सरपंच , उपसरपंचांकडून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रामपंचयाती बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेकडून घेण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *