आ.गुट्टे यांच्या उपस्थितीत राणीसावरगाव येथे वेदी प्रतिष्ठा महोत्सवाची सुरुवात

आ.गुट्टे यांच्या उपस्थितीत राणीसावरगाव येथे वेदी प्रतिष्ठा महोत्सवाची सुरुवात गंगाखेड/प्रतिनिधी:-अहमद अन्सारी पाथरी परभणी मो. 7218275486. समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार करणारा “जगा आणि जगू द्या” या तत्वाला मानणारा अतिप्राचीन जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील एक महत्त्वाचा धर्म आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. श्री 1008 आदिनाथ भगवान अतिशय क्षेत्र दिगंबर जैन मंदिर राणीसावरगाव ता. गंगाखेड येथे भव्य वेदी प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन १४ ते १६ डिसेंबर २०२१ *परमपूज्य मुनि सुवंद्य सागर जी महाराज* यांच्या सानिध्यात होत आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे *आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे* यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष दिलीप घेवारे साहेब, प्रमुख अतिथी चंद्रशेखर विलासरावजी उदगीरकर, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे,राहुल बनाटे,बालाजी वाघमारे, बालाजी लटपटे, वेदी दातार श्री व सौ विनयश्री विजयकुमार नाल्टे नांदेड, श्री व सौ सविता सुधाकरराव नाल्टे गंगाखेड, सुंदरलाल सावजी बँक जिंतूर चे अध्यक्ष श्री मुकुंदजी कळमकर, श्री श्रीपाल जी गंगवाल, संजय जी पापडीवाल, रामदासजी लोहेकर, भास्कर ठावरे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आयोजक श्री रामदास प्रल्हादराव संघई क्षेत्राध्यक्ष व संपूर्ण क्षेत्र कार्यकारिणी राणीसावरगाव, श्री आर्यनंदी युवामंच गंगाखेड, सकल दिगंबर जैन समाज गंगाखेड जिल्हा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *