अल्पवयीन मोलकरणीला विवस्त्र करून त्रास देत व्हिडीओ बनवणाऱ्या अभिनेत्रीला अटक

. एका २५ वर्षीय अभिनेत्रीला पोलिसांनी घरातील अल्पवयीन मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे . पीडितेने अभिनेत्रीवर विवस्त्र करून त्रास दिल्याचा आरोप केला आहे . एएनआयने केलेल्या ट्विटनुसार , वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे अभिनेत्रीने घरातील मोलकरणीला मारहाण केली . मिळालेल्या माहितीनुसार , आरोपी अभिनेत्री वर्सोवा येथील रहिवासी असून ती एका फ्लॅटमध्ये एकटीच राहते . मात्र , पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे . पिंकविलाच्या रिपोर्टनुसार , आरोपी अभिनेत्रीने तिच्या घरातील मेडला अनेकदा मारहाण केली आहे . याचे कारण नीट काम होत नसल्याचे सांगितले जात आहे . अल्पवयीन पीडितेने यापूर्वी तक्रार दिली नव्हती , मात्र तुकतेच या अभिनेत्रीने पुन्हा असे वर्तन केल्याने घरच्यांनी पोलिसांची मदत घेतली . अभिनेत्रीने कपड्यांशिवाय तिचे व्हिडिओ आणि फोटो काढण्याचाही प्रयत्न केल्याचे पीडितेने म्हटले आहेपीडितेने पोलिसांना सांगितले की , अभिनेत्रीने तिच्यावर सैंडल फेकून हल्ला केला आणि त्यानंतर तिच्या डोक्यालाही दुखापत झाली . उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर पीडितेच्या नातेवाइकांनी जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली . पोलिसांनी सध्या कलम 3 ( हल्ला ) , 354 ( ब ) ( महिलावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी ) आणि कलम 504 ( हेतूपूर्वक अपमान ) लैंगिक अपराध कायदा ( POCSO ) अंत एफआयआर नोंदवला आहे .. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *