शेतकरी नेते मारोती गीते यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन तहसीलदार मांडवगडे यांच्या हस्ते सत्कार
शेतकरी नेते मारोती गीते यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन तहसीलदार मांडवगडे यांच्या हस्ते सत्कारसेनगांव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते भव्य सत्कार करून प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.शेतकरी नेते मारोती गीते हे मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवत असून तसेच त्यांनी पोळा सणाच्या अनुषंगाने पळस वृक्ष न तोडण्याचे आवाहन केले होते त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांचा आज तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.