धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

सहसंपादक/मनोज टाक

आज दिघोळ ,अनपटवाडी ता.पाटोदा जि बीड येथे धनगर मेळावा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दिघोळगावकर यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्राचे नेते प्रकाश भैय्या सोनसळे या कार्यक्रमाचे पाहुणे नारायण भोंडवे जिल्हाप्रमुख बीड , भरत गाडे युवक जिल्हाप्रमुख बीड ,दत्ता गाडेकर उपजिल्हाध्यक्ष बीड,अरूण काकडे तालुका उपाध्यक्ष पाटोदा,अमोल भोंडवे युवा नेते, महादेव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. राष्ट्रसंत बाळूमामा महाराज यांच्या मंदिरात दर आमवशा दिवशी मोठा कार्यक्रम आयोजित करत असतात याही कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीसंत बाळूमामा महाराज मूर्तीचे दर्शन घेऊन गावकऱ्यांना संबोधित करताना प्रकाश भैय्या सोनसळे त्यांनी सांगितले.आता महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी राज्याभर मोठा लढा सुरू झाला आहे धनगर आरक्षण अंमलबजावणी करायची असेल तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री महोदय हे संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मंत्री येणार आहेत या मंत्र्यांना धनगर समाजाचे शिष्टमंडळ आरक्षण कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी या सरकारने केली नाही तर धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,राज्यमंत्री, पालकमंत्री , आमदार यांना धनगर समाज रस्त्यावर फिरवून देणार नाही असा इशारा धनगर समाजाचे महाराष्ट्राचे नेते प्रकाश भैय्या सोनसळे यांनी बोलताना सांगितले धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. नारायण भोंडवे यांनी बोलताना सांगितले की धनगर आरक्षणाची दखल या राज्य सरकारने लवकरात लवकर घेतली पाहिजे धनगर समाजांना एसटी आरक्षण प्रमाणपत्र दिले पाहिजे अन्यथा पालकमंत्र्यांना व आमदार यांना निवेदन देण्यात येणार आहे यावेळी,श्री कांतीलाल तागड, गोकुळ तागड, ज्ञानेश्वर तागड, ऋषिकेश तागड, भगवान तागड, भुजंग तागड ,परमेश्वर तागड, सोमीनाथ तागड ,लक्ष्मण तागड ,श्रीराम तागड ,जयराम तागड ,लिंबाजी तागड,श्री परमेश्वर तागड (कापड दुकानदार),बिभिशन पारखे,डॉ नवनाथ गिरे,संतोष तागड,कांतिलाल भाऊ तागड,भुजंग तागड,बळीराम तागड ,(सरपंच),केशव तागड,माऊली निर्मळ,राहुल बोंद्रे,हनुमान तागड,नारायण बनसोडे,सतेश वैद्य,गणेश तागड,बाळु तागड,बबन तागड,बबन निर्मळ,नारायण तागड,पोपट आण्णा तागड,दैनुभाऊ तागड,शरद तागड,राजेंद्र तागड,धनराज तागड,रूनी मुसळे,औंकार बोंद्रे,श्रीमल तागड,सचिन निर्मळ,माऊली तागड,गोकुळ तागड,सचिन तागड,शहाजी तागड,मनोज तागड,अशोक तागड,बाबु तागड,किसन तागड,जयराम तागड,माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माता भगिनीं, पंचक्रोशीतील अनपटवाडी, घुमरा पारगाव, बेदरवाडी ,पिंपळगाव, पाटोदा, रोहतवाडी ,येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *