वझर खुर्द येथील शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन,उपोषणाचा दिला इशारा
सेनगांव तालुक्यातील वझर खुर्द येथील काही शेतकऱ्यांनी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी तहसीलदार सेनगांव यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले आहे.वझर खुर्द येथे सन 2022-23 मधील मार्च महिन्यात अतिवृष्टी व गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते.मात्र नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने व तसेच अतिवृष्टी व गारपिटीने पिकांचं नुकसान झालेली यादी पिक वाईज प्रत्यक्ष जायमोक्यावर केलेली नसल्याने संबंधित सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी हे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. तसेच मागणी मान्य न झाल्यास दिनांक 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा वझर खुर्द येथील शेतकऱ्यांनी दिला असून या निवेदनावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.