हिंगोलीत व्हाईस ऑफ ऑफ मीडियाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

हिंगोली प्रतिनिधी शेख खाजा

राज्यातील सर्व पत्रकारांच्या प्रश्नांचा विचार करुन व्हॉईस ऑफ मिडीया या देशपातळीवरील पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी सरकार दरबारी आपले म्हणने सादर करत केले आहे. हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने आज दि. 31 ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी व सरकारचे लक्ष वेधण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

व्हॉईस ऑफ मिडिया हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने आज 31 ऑगस्ट रोजी पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पुर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचलालयाने शासनाने पोर्टल तयार करुन, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी करुन किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण केले आहे, अशांना पत्रकार म्हणुन प्रमाणपत्र देण्यात यावे. जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.राज्यातील अनेक वर्तमान, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा.पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातुन पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने घ्यावी. माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासुन रखडले आहेत, ते देण्यात यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन 20 हजार रुपये करु, अशी घोषणा केली होती. टिव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा.अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत. सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातीबाबत पॉलिसी बनवावी. सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पुर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कूटूंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येकी नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात, सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांने पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी यावी यासह विविध मागण्यासाठी आज 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 01 वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. तसेच या धरणे आंदोलनाला शेतकरी नेते व शिवसेनेचे अजित मगर, शिवसेना तालुकाप्रमुख आनंदराव जगताप यांनी पाठिंबा दिला आहे,या विविध मागण्याचे निवेदन व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम, सरचिटणीस रमेश चेंडके, माधव दिपके, राज्य उपाध्यक्ष तुकाराम झाडे,राज्य संघटक विजय पाटील, ज्ञानेश्वर उंडाळ, श्याम सोळके, नंदकिशोर कांबळे, संजय बरदापुरे, कपिल सावळे, संजय कावडे,शिवाजी घुगे, संजय कापसे, विठ्ठल देशमुख, प्रमोद नादरे, बाळासाहेब साळवे, शेख वाजेद, वसंत पाटील, संतोष राठोड , प्रल्हाद शिंदे, मनोहर नाईक , शेख हाफिज शेख हाजी, सुनील पाठक, विजय गुंडेकर, गजानन कानडे , अरविंद पवार, नारायण रणखांबे , मदन बियाणी,बद्रीनारायण गलंडे, रंगनाथ नरवाडे , राजू गवळी, दत्तात्रय शेगुकर, रमेश सांगळे, राजू जयस्वाल , सुनील इंगळे, विलास काचगुंडे, विठ्ठल बोधने, अशोक अडकिने ,दिवाकर आदमाने, उत्तम मुदनर, अक्षय शेळके, संजय बहात्तरे, गंगाधर मस्के, सीसवे, सुरेश पवार कैलास खिलारे, बाबाराव धवसे, सय्यद अहमद रसूल, राजेंद्र धुळे, संतोष दिवाने, भीमराव बलखंडे, संजय सारसकर, अनिता चव्हाण, पल्लवी अटल, श्रीकांत घुगे, गजानन टेकेवार , विशाल शितळे,अरुण दिपके सह जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थिती होते.तीन तास धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.यावेळी पत्रकारांनी विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.आपलाचंद्रमुनी बलखंडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुखव्हाईस ऑफ मीडिया, हिंगोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *