आतिक आत्तार याचां अजित पवार गटात जाहीर प्रवेश
हिंगोली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अतिक आत्तार पुसेगांवकर यांनी मुंबई येथे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी अतिक अत्तार, कळमनुरीचे माजी उपनगरअध्यक्ष मो. नजीम रिजवी, असद कादरी, शेरखान पठाण यांच्या सह हिंगोली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अतिक अत्तार यांनी प्रवेश केला आहे.