गारपीटीची यादी चुकीची जाहीर केल्याने वझर खुर्द येथील शेतकऱ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
गारपीटीची यादी चुकीची जाहीर केल्याने वझर खुर्द येथील शेतकऱ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवरसेनगांव तालुक्यातील वझर खुर्द या ठिकाणी काही महिन्यापूर्वी झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.मात्र त्यानंतर गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला असून यासंदर्भात शेतकऱ्यांनी तहसीलदार सेनगांव यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली होती.त्यानंतर आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेनगाव तहसीलचे नायब तहसीलदार गायकवाड गेले असता एकच गोंधळ उडाला असून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला आहे.