पुसेगांव येथील नागरिकांचे विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण..
सेनगाव तालुका प्रतिनिधी तुकाराम धाबे पुसेगावकर
पुसेगांव येथील नागरिकांचे विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण….. सेनगांव तालुक्यातील पुसेगांव येथील नागरिकांनी आपल्या विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.ग्रामपंचायत पुसेगांव मध्ये पंधराव्या वित्त आयोगाची कामे ही इस्टिमेट नुसार झाली नाही.तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.त्याच अनुषंगाने झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुसेगांव येथील नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.