परमेश्वर इंगोले यांना छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार जाहीर
परमेश्वर इंगोले यांना छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार जाहीर सेनगांव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांना युवा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आशीर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असून युवा नेतृत्व परमेश्वर इंगोले यांचे सामाजिक कार्य पाहता युवा क्षेत्रातील छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.