बदनापुर तालुक्यातील कडेगाव फाटा ते सोमठाणा फाटा चालू असलेले अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी ने दिले पोलीस ठाणे बदनापुर येथे निवेदन
बदनापुर तालुक्यातील कडेगांव, गेवराई फाटा ते सोमठाणा फाटा या अंतर्गत चालू असलेल्या अवैध धंद्यामुळे येथील तरुण नवं पिढीतील मुलं मुलींवर याचा परिणाम होत आहे. गेवराई तसेच कडेगांव येथून शाळा कॉलेज ला ये जा करणारे विद्यार्थी वाम मार्गाकडे जातांना दिसत आहे पो नि . भागवत यांनी तत्काळ लक्ष देऊन चालू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालावा व अवैद्य धंद्यावर कारवाई करावी असे निवेदन बहुजन मुक्ती पार्टी ने पोलीस ठाणे बदनापुर येथे दिले व बदनापूर पोलिस स्टेशन चे नवीन पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांना “स्वतंत्र भारताच्या चळवळीचे दोन आंदोलन” हे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे जालना जिल्हाध्यक्ष बुध्दभूषण तुपे,मोहन हिवराळे ,बदनापूर तालुका अध्यक्ष अनिल अंभोरे ,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलासराव साळवे, मनता कामकर (लहुजी क्रांती मोर्चा),कुंडलिक घोरपडे(लहुजी क्रांती मोर्चा),विश्वास कामकर,राजू सानप,अजहर शेख,नवनाथ खरात,बाबासाहेब खडेकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते….