भोकरदन गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या पालकांच्या ठिय्या आंदोलनास महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचा जाहिर पाठिंबा
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील मराठी व उर्दू जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे 247 पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाकडे वेळोवेळी मागणी करूनही कुठलीच दखल घेत नसल्याने बळीराजा फाऊंडेशन चे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्या नेतृत्वात पालकांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनास महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचा जाहिर पाठींबा देण्यात येत आहे.गरीबांच्या जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा पुढार्यांच्या आणि अधिकार्यांच्या खाजगी शाळांना विद्यार्थि पुरवण्याचा हा कुटिल डाव आणि षडयंत्र आहे.पालकांच्या आंदोलनास पुर्ण पाठिंबा असुन सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह भोकरदन गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तिर्व आंदोलन करणार आहे.असा इशारा महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आला आहे.