केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडले जाईल :- सिद्दीक शेख.
, बदनापुर,हाफिज हारून पठाण
केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुसूचित जातीच्या विध्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिले जाते.मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे आज हजारो विध्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून आपल्या हक्काच्या शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे बदनापुर तालुका सरचिटणीस सिद्दीक शेख म्हणाले आहे की, ही बाब अतिशय गंभीर असून राज्य सरकारने तात्काळ शिष्यवृत्ती देऊन त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्कवसुली करू नये असा शासन निर्णय करून त्यांची तत्काळ अंमलबाजवणी करावी अशी मागणी करणार आहोत. आमच्या या मागण्या लवकरात लवकर जर मान्य नाही झाल्या तर सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे बदनापुर तालुका सरचिटणीस सिद्दीक शेख यांनी दिला आहे.