वाघजाळी ग्रामपंचायत कडुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ.सूर्यकांता तांबिले व संगीताबाई साखरकर सन्मानित

वाघजाळी ग्रामपंचायत कडुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ.सूर्यकांता तांबिले व संगीताबाई साखरकर सन्मानितसेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे आज दिनांक 21 /5 /2023 सकाळी 10.30 वाजता गावचे सरपंच विवेकानंद तांबिले व ग्रामसेवक काकडे साहेब यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व पुरस्कार सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमानाने गौरव करण्यात आला नुकतेच मागील महिन्यातच तालुक्यातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सूर्यकांता तांबिले यांचा तालुक्यातून प्रथम पुरस्काराने जिल्हा समन्वयक (उमेद)गलांडे साहेबांनी सन्मानित केले होते त्यात आणखीन वाघजाळी ग्रामपंचायतने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित केले आज बुधवारी सत्कारमूर्ती सौ. सूर्यकांता परमानंद तांबिले व सौ.संगीताबाई अशोक साखरकर यांना सन्मानित करण्यात आले यावेळी गावचे नव तरुण सरपंच विवेकानंद तांबिले व ग्रामसेवक काकडे साहेब ग्रामपंचायत उपसरपंच वैशाली गांधींले सदस्य गिताबाई तांबिले वर्षा तांबिले अनिता गांधींले अनिल मोरे तुळशीराम साबळे नारायण कराळे मिलिंद मोरे कैलास कराळे सर सुरेश चिभडे संगणक चालक गजानन तांबिले सेवक ज्ञानेश्वर गांधिले सुनिल मोरे नंदाबाई पट्टेबहादूर दुर्गाबाई अवचार सुवर्णाबाई साखरकर
