दिल्लीतील अधिवेशनासाठी परमेश्वर इंगोले यांची निवड…..
हिगोंली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा
सेनगाव तालुक्यातील युवा नेतृत्व परमेश्वर इंगोले यांची दिल्ली येथे होणारे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रती अधिवेशनासाठी निवड झाली आहे दिनांक 25 ते 27 एप्रिल या कालावधीतील महाराष्ट्र सदनमध्ये अधिवेशन होणार आहे देशाच्या राजकारणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत परमेश्वर इंगोले हे केंद्रीय राजकीय समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतात त्यांनी राजकीय समितीच्या विविध विषयावरती चर्चा करण्याची आणि ठराव मांडण्याची संधी अधिवेशनाच्या माध्यमातून मिळणार आहे दहा वेगवेगळ्या केंद्र समितीचे पदाधिकारी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत परमेश्वर इंगोले यांचे शेतकरी, बेरोजगार तरुण , यांच्या हितासाठी असलेले काम आणि अनुभव यामुळे त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले आहे देशातील राजकारणामध्ये तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग व तरुणांना मिळणारी संधी ,तरुणा पुढील असणारे राजकीय आव्हाने या विषयावर ते तेथे आपले मत व्यक्त करणार आहेत त्यांच्या निवडीबद्दल सेनगाव तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे…..
