सेनगाव :-येलदरी धरणातून डावा कालवा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सचिव परमेश्वर इंगोले यांचे आमदार जयंत पाटील यांना निवेदन
मुंबई /प्रतिनिधी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष मा.श्री जयंतराव पाटील साहेब यांची भेट सेनगाव तालुक्यातील आजेगाव सर्कल मधील विविध अडचणी संदर्भात चर्चा करत येलदरी धरणातून डावा कालवा काढून सेनगाव तसेच हिंगोली शेतकऱ्यांना पाणी मिळून देत सुजलाम सुफलाम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री यांना पत्र देण्यात येईल तसेच स्वतः जयंतराव पाटील साहेब या संदर्भात पाठपुरावा करणार असून जलसंपदामंत्री महोदय यांच्या कडे या संदर्भात मीटिंग लावून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांना दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख उपस्थित होते…