हिंगोली शहरात भरदिवसा जबरी चोरी करणारी टोळी अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

हिगोंली जिल्हा प्रतिनिधी :-शेख खाजा

दि. १ एप्रिल २०२३ रोजी १५.०० वा. चे सुमारास अॅटोरिक्षा मध्ये बसुन जात असलेल्या फिर्यादीस अॅटोचालकाने त्याच्या ईतर दोन साथीदारासह हिंगोली येथील चौधरी पेट्रोल पंप समोर रोडवर जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील नगदी ५०,०००/-रु काढुन घेवुन गेले त्यावरून पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुरनं.. २६८/२०२३ कलम ३९२, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर साहेब यांनी सुचना देवुन, सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केल्याने पो. नि. श्री पंडीत कच्छवे, स्था. गु. शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विक्रम विठुबोने व स्था.गु.शा. पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देवुन, फिर्यादीस विचारपुस केली असता फिर्यादीकडुन संशईत आरोपीचे अंगावरील कपडे, त्यांची बोलीभाषा याबाबत माहिती घेवुन, घटनास्थळाजवळील व परिसरातील सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक करून संशईत आरोपींबाबत माहिती काढुन, मिळालेल्या माहितीवरून सदरील आरोपींचा शोध घेणे कामी गोपनिय बातमीदारांना सिसीटीव्ही फुटेज व आरोपीबाबत माहीती दिली असता, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा १) गजानन हांडे, २) वैजनाथ चव्हाण, ३) भिकाजी काळे यांनी केला असुन सदरील आरोपी हे इंदिरागांधी चौक येथे एका अॅटोमध्ये बसलेले आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ सदर ठिकाणी जावुन तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव, गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) गजानन ज्ञानबा हांडे, वय ४२ वर्ष, व्यवसाय अॅटो चालक, रा. हमालवाडी, हिंगोली, २) वैजनाथ उर्फ वैजु बबन चव्हाण, वय २२ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. पारधीवाडा, हिंगोली, ३) भिकाजी उर्फ भैरा जगन- काळे, वय २८ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. पारधीवाडा, हिंगोली असे सांगीतले. त्यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केले असल्याचे कबुली दिलेने, त्यांचेकडुन गुन्हयातील गेलामाल नगदी ५०,०००/- रूपये व गुन्हयात वापरलेला तीन चाकी अॅटोरिक्षा असा एकुण २,००,०००/- रूपयाचा माल जप्त करून त्यांना पुढील तपासकामी पो.स्टे. हिंगोली शहर येथे हजर केले आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री पंडीत कच्छवे, पोउपनि विक्रम विठुबोने, पोलीस अंमलदार नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, प्रमोद थोरात, नरेंद्र सावळे, स्था.गु.शा. हिंगोली यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *