सेनगाव तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करत घरकुल अनुदानात मध्ये शहरी भागप्रमाणे वाढ करा… परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी ….
शेख खाजा हिगोंली जिल्हा प्रतिनिधी
शहरी भागामध्ये मिळणारे अनुदान या प्रमाणे ग्रामीण भागासाठी सुद्धा समान देण्यात यावे ही मागणी निवेदन द्वारे करण्यात आली केंद्र व राज्य सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास, रमाई घरकुल आवास , यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाच्या अनुदानाची रक्कम 3 लाखा 50 हजार रुपयांपर्यंत वाढून मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी सेनगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे निवेदनात म्हटले आहे की गरिबांना हक्काच्या घरात राहता यावी या करिता भारत सरकार व राज्य सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना ,रमाई घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, या योजनेसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधी अत्यंत कमी आहे ,वाढती महागाई लक्षात घेता ,सिमेंट ,वाळू विटा, डबल मजुरी ,लोखंडी साहित्य ,इत्यादीचे भाव प्रचंड वाढले असल्याने लाभार्थ्यांनी आपले घर बांधू शकत नाहीत ग्रामीण भागातील लाभार्थी घरकुल बांधण्यासाठी साहित्य घेण्यासाठी शहरात तालुक्याच्या ठिकाणी जातो. या मार्गामुळे वाहतुकीचा खर्चही मोठा असतो त्यामुळे शासनाकडून प्रधानमंत्री आवास, शबरी आवास ,रमाई आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुला रक्कम तीन लाख 50 हजार रुपयापर्यंत वाढून मिळावी त्यामुळे गरीब लाभार्थी आपल्या हक्काचे घर बांधू शकतील तसेच तालुक्यातील वंचित ,बेघर लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी गटविकास अधिकारी श्री कोकाटे यांच्याकडे केली आहे यावेळी श्री गजानन नानवटे, श्री सुरेश पुंडगे ,श्री वैभव गव्हाणे ,लक्ष्मण गिते ,करण घोंगडे आदी उपस्थित होते…