भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचा दणका
शेख खाजा हिगोंली जिल्हा प्रतिनिधी
आज नामांकित इंग्रजी शाळा एल के आर आर इंग्लिश स्कूल सेलू जिल्हा परभणी येथील शाळेत डिसेंबर महिन्यात आदिवासी विद्यार्थिनीचे हातपाय बांधून तिच्या तोंडात कपड्याचा मोठा गोळा टाकून रात्रभर तिला तशा अवस्थेत ठेवून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला या घटनेची सदर शाळेने कोणतीही दखल न घेता सदरचे प्रकरण दाबण्याचे काम केले जवळपास एक महिन्यापासून कोणत्याही पालकांचा संपर्क शाळेतील विद्यार्थ्यांची होऊ दिला नाही त्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली होती या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक वेगळे शिक्षण दिले,निष्कृष्ट दर्जाचे जेवण आणि त्यांना वेळोवेळी आदिवासी असल्याचेही हिन वागणूक देऊन त्यांना अपमानित केले जात होते तसेच तुम्ही तुमच्या पालकांना शाळेत घडलेला प्रकार सांगितल्यास तुम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण करू तसेच तुम्हाला शाळेतून काढून टाकू तुम्हाला नापास करू अशा धमक्या दिल्या जात होत्या याबाबत सदर शाळेतील विद्यार्थ्यांनी पालकांनी आदिवासी पॅंथर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडके यांची भेट घेतली व त्यांना सदरचा प्रकार सविस्तर सांगितला आणि याबाबत तात्काळ कळमनुरी पोलीस स्टेशन येथे जाऊन दोषी प्राचार्य, व स्त्री अधिक्षिका यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी कायदा व इतर विविध कलमाने तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा सेलू पोलीस स्टेशन जि. परभणी या ठिकाणी यासाठी आदिवासी पॅंथर संघटनेचे तालुका अध्यक्ष दतरावजी गुव्हाडे युवा अध्यक्ष उत्तमराव काळे ॲड. रामराव जुंबडे साहेबराव भरकाडे सामाजिक कार्यकर्ते वाळकी सरपंच संतोष डुकरे व मोठ्या प्रमाणात पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते सदर घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या शाळेतील आरोपींविरुद्ध प्रशासकीय कारवाई करून त्यांना शाळेतून निलंबित करण्यात यावे व विद्यार्थ्यांची परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील नामांकित इंग्रजी शाळेत घेण्यात यावी सदर शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अश्या मागन्या प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांना निवेदन देऊन करण्यात आल्या व त्यासोबतच सदर गुन्ह्याची एफआरची प्रत त्यांना देण्यात आली त्यानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशांत बोडखे आणि ॲड. रामरावजी जुबडे यांचा सत्कार करून त्यांनी आभार व्यक्त केले