कळमनुरी तालुक्यातील वाहनांना टोल वसुली मधून सूट द्या/- शेतकरी नेते अजित मगर

हिगोली:-राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्यावरून जाताना साळवा ता. कलमनुरी शिवारात टोल वसुली नाका बांधकाम सुरू आहे, त्या रस्त्यावरुन कळमनुरी तालुक्यातील अनेक वाहने दररोज ये जा करतात कारण तेथून जवळच असलेली आखाडा बाळापूर हि जिल्यातील प्रमुख बाजारपेठ पैकी एक असून ती मोठी आहे, कळमनुरी विधानसभेतील शेतकरी आपला भाजीपाला प्रामुख्याने या बाजारपेठेत विक्री साठी नेतात, हिंगोली जिल्हा हा ना उद्योग जिल्हा असल्याने, येथील शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत, तसेच आखाडा बाळापूर, डोंगरकडा, हिवरा, जवळा पांचाळ, वारंग फाटा येहलेगाव (तू )परिसरातील नागरीकांना कळमनुरी येथे तालुक्याच्या ठिकाणी नेहमीच यावे लागत आहे, कळमनुरी शहराच्या बाजूला शेतमाल विक्री चे मोठे (फार्मर प्रोडूसर कंपनी यांचे) मार्केट यार्ड आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग यांना टोल भरणे परवडणारी बाब नसून, त्यामुळे कळमनुरी विधानसभेतील नागरिकांना टोल मध्ये माफी करण्यास महामार्ग प्रशासनास आदेशीत करावे, अशी मागणी जिल्हा धिकारी यांना शिवसेना – शेतकरी नेतै अजित मगर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *