पुसेगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमच शंकर पटाचे आयोजन,18 व 19 जानेवारी रोजी रंगतदार लढती,लाखोची बक्षीसे जाहीर
हिगोंली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा
पुसेगाव- सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रथमच शंकर पटाचे आयोजन करण्यात आलेले आहे.शंकरपट पाहण्यासाठी पुसेगाव परिसरातील शंकरपट प्रेमीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.पुसेगाव परिसरात प्रथमच शंकरपटाचे आयोजन केल्यामुळे शंकरपट प्रेमींना त्यांचा आस्वाद घेतला जाणार आहे.शंकरपट आयोजनाला राज्य सरकारची बंदी होती परंतु सुप्रीम कोर्टाने यावर बंदी उठवली त्यामुळे शंकरपट प्रेमिनी पुसेगाव येथे शंकरपटाचे आयोजन 18 व 19 जानेवारी रोजी आयोजित केले आहे.यामध्ये लाखोची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे या मध्ये महाराष्ट्रातील नामांकित जोड्या येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.या मध्ये प्रथम बक्षीस 31000 रुपये सीतारामजी जवळे,शामराव शिरामे,विलास शिनगारे यांच्याकडून दिले जाणार आहे.द्वितीय बक्षीस 21000 रुपये गजानन खंदारे व वैभव अंभोरे,तृतीय बक्षीस 15000 रुपये टी एस साठे व सदानंद निर्मळ यांच्याकडून तसेच यापद्धतीने 17 बक्षीसे ठेवण्यात आली आहे.पुसेगाव परिसरातील शंकरपट प्रेमिनी जास्तीत जास्त संख्येने शंकरपटाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान पंचकमेटी तील अध्यक्ष भागवत शिनगारे,उपाध्यक्ष प्रकाश ठोके,सचिव सौरभ जवळे,रामराव शिरामे,विलास शिनगारे,विनायक धामणे यांनी केले आहे.