व्हाईस ऑफ मीडियाच्या वसमत तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील तर उपाध्यक्ष नामदेव दळवी यांची निवड
हिगोंली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी देशातील १८ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची तालुका कार्यकरणी गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तालुका अध्यक्ष पदी प्रमोद पाटील तर उपाध्यक्ष पदी नामदेव दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.व्हाईस ऑफ मिडिया या संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना देश, प्रदेश पातळीवर काम करीत आहे. वसमत येथे लिट्ल इंग्लिश स्कूल तालुका बैठक संपन्न झाली असून यामध्ये जिल्हाध्यक्ष रमेश कदम ,जिल्हा सरचिटणीस रमेश चेंडके जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी देशमुख गजानन वाणी, संजय बरदापुरे, माधव दिपके, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडाळ कार्यवाहक शाम सोळंके ,संघटक मनीष खरात ,गजानन पवार यांच्या उपस्थितीत वसमत तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष नामदेव दळवी, सचिव सुरेश पवार, पंजाब नवघरे संघटक, नाहीद सिध्दकी सह संघटक, सह सचिव अमजद बेग, कोषाध्यक्ष उध्वव देशमुख, बल्लय्या स्वामी कार्यवाहक, मुंजाजी जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख, खदिर अहमद सह संघटक शरीफ आलम कार्यकारिणी सदस्य, नागराज एंगडे, रशीद पठाण अशी नियुक्ती करण्यात आली. व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी स्थापन केली आहे देशातील आठरा राज्यांमध्ये संघटना कार्यरत असून राज्यातील सुमारे २२ जिल्ह्यात संघटनेचे कार्य सुरू आहे. कोरोना काळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यांच्या कुटूंबियांना कुठलिही मदत मिळाली नाही. मात्र या संघटनेने पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे. पत्रकारिता पत्रकार यांच्या हितासाठी संघटनेचे कार्य सुरू आहे. रविवारी वसमत तालुका कार्यकारी बैठकीत व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य आदिनाथ दशरथे, विजय डाढाळे, लक्ष्मण बोखारे,आदींची उपस्थिती होत