नेमीनाथ जैन यांचा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात परिसंवादात सहभाग

सहसंपादक/मनोज टाक

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रंथपाल तथा पत्रकार नेमीनाथ जैन यांना शेगाव येथे १४ व १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात परिसंवादात सहभागी होण्याचे निमंत्रण आले आहे.जैन हे मागील 24 वर्षापासून ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत असून तीस वर्षापासून ते पत्रकारिता करीत आहेत .त्यांना ग्रंथालय क्षेत्रातील व पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे. विविध वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम केल्यानंतर 2011 पासून त्यांनी लोकदिलासा हे साप्ताहिक चालू केले आहे. लोकदिलासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांना वाच्या फोडत असतात .त्यांना 14 व 15 जानेवारी रोजी शेगाव येथे संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशनात पाचव्या सत्रात “ग्रंथालय चळवळीत माध्यम प्रतिनिधीचे योगदान” या विषयावर बोलण्यासाठी संयोजन समितीने निमंत्रित केले आहे. ग्रंथालय क्षेत्रातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांची झालेली निवड हा त्यांचा आणि त्यांच्या सकस दर्जेदार लेखनाचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. याबद्दल त्यांचे विविध व्यक्ती, संस्था आणि समूहाकडून अभिनंदन केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *