विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी राम रेघाटे यांची निवड
सहसंपादक/मनोज टाक
जिंतूर : औरंगाबाद येथिल वाळूज बजाज महानगर येथे पार पडलेल्या विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य च्या राज्यस्तरीय बैठकीत जिंतूरच्या राम रेघाटे यांची महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून निवड करण्यात आली. विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ व प्रदेश अध्यक्ष बजरंग खर्जुले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. राज्यस्तरीय बैठकीला विशेष प्रमुख अतिथी म्हणून संजय शहाणे, शेवंतकर, उद्योजक रवींद्र पांचाळ यांची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्यातील ११ जिल्ह्यातून राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पांचाळ यांनी मार्गदर्शन केले व सोहळ्यात निवड केलेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत संघटनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभाग करून घेण्याचे आदेशित केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ व प्रदेशाध्यक्ष बजरंग खर्जुले यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.