अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदी सुवर्णाताई आकमार यांची निवड
सेनगाव/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स च्या वतीने मौजे कुंभारी ता.जामनेर जि.जळगाव येथे दि.२४ डिसेंबर व २५ डिसेंबर दोन दिवसीय राज्यस्तरीय पदाधिकारी आभ्याष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापुरकर यांनी सेनगाव महिला तालुकाध्यक्षा पदी सौ.सुवर्णाताई प्रशांत आकमार यांची निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील बाबा खंडापुरकर,राष्ट्रीय समन्वयक गिरीराज महाराज,राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर,राष्ट्रीय उपाध्यक्षा शोभाताई बल्लाळ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण चव्हाण-देशमुख,प्रदेशाध्यक्षा अँड.राणीताई स्वामी,प्रदेश सरचिटणीस प्रभाकर साळवे,प्रदेश युवती अध्यक्षा सनाताई शेख,मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी काळे,हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,किसान विभाग जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख,हिंगोली जिल्हा महिला अध्यक्षा वंदनाताई थिट्टे,हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख तथा पत्रकार विश्वनाथ देशमुख,सेनगाव तालुकाध्यक्ष गजानन टेकाळे,कळमनुरी तालुकाध्यक्ष रविकुमार गोरे,सखाराम आकले,प्रशांत आकमार,प्रकाश जोगदंड,उचित कवडे आदीसह इतर जिल्ह्यातील पदाधिकारी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.