LIVE Update: कृषिमंत्री अब्दुल सत्तार नॉट रीचेबल महाराष्ट्रात राजकीय भूकंप
विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार तसेच राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आता ना. अब्दुल सत्तार कुठे आहेत याची चर्चा पाहायला मिळत आहे. सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होताच ते ‘नॉट रीचेबल’ असल्याचे समजत आहे. सत्तार सद्या आपल्या नागपुरातील निवासस्थानी देखील नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सत्तार यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून मोठे राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे?नागपूर येथील भूखंड घोटाळा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील कृषी महोत्सवाच्या नावाने पैसा जमा करण्यात येत असल्याच्या आरोपानंतर राजकीय विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर ना. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधक आमदारांनी केली आहे. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच अब्दुल सत्तार नॉट रिचेबल असल्याने याबाबत आणखीनच चर्चा रंगत आहे.| राज्यात राजकीय भुकंप कृषिमंत्री अब्दुल सत्तार नॉट रिचेबल.