चोरीला गेलेल्या 6 दुचाकी जप्त जवळा बाजार परिसरात पोलिसांची कारवाई, दोघांना अटक, आणखी दुचाकींचा शोध सुरू

हिगोंली जिल्हा प्रतिनिधी:- शेख खाजा

हट्टा. अंतर्गत जवळा बाजार ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मागील काही दिवसांपासून येथील परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी करडी नजर ठेवल्याने अखेर दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात हट्टा पोलिसांना यश आले आहे.१९ डिसेंबर रोजी आठवडी बाजार बैल बाजारातून एक दुचाकी चोरीस गेली होती. याबाबत हट्टा पोलिसात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने याप्रकरणी पोलिसांचे तपासकार्य सुरू होते. त्यानुसार जवळा बाजार चोरी झालेल्या दुचाकीवरून विजय दत्तराव नागरे (वय २६) व त्याचा साथीदार कलाम मुसाखान पठाण (वय (२४ रा. चिकलठाणा बुद्रुक ता, सेलू जि,परभणी) हे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दुचाकीसह या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून इतर गुन्ह्यातील आणखी सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या चोरट्यांनी अजून किती दुचाकी लंपास केल्या आहेत. याचा तपास पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील हिंगोली, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे वसमत, यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, राजेश ठाकूर, राजेश वळसे, प्रफुल्ल आडे, महेश गर्जे, सूर्यकांत भारशंकर, शेख मदार, अंबादास बेले, यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *