वसमत तालुक्यातील गावात भुकंपाचे धक्के
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिरळी, वापटी, कुपटी, डोनवाडा, कुरुंदा, सेलू, आंबा यासह आदी गावात ७ ते ८ वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. जमीन हादरणे, भूगर्भातून आवाज येणे, असे प्रकार घडत आहेत. आज दुपारी २ वा ८ मिनिटाला पुन्हा सौम्य धक्के अनुभवण्यास आले. खाजनापूर वाडी, आंबा, कुरुंदा यासह इतर गावांना भूगर्भातून आवाज येत जमीन हादरत असल्याचे जाणवले. यात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती तलाठी एन. गिते यांनी दिली.तसेच दांडेगाव परिसरातील रामेश्वर, सालापूर, दिग्रस बुद्रुक, बागल पारडी जवळपासच्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसले. दांडेगाव तसेच परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता पुन्हा आज भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.