राजेगाव व मालेगाव दुधना ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा दावा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर दावे प्रतिदावे सुरूच
सहसंपादक/मनोज टाक
निवडणूक बातमी
जिंतूर: तालुक्यातील एकूण 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. 20 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकालही जाहीर झालाय. तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीवर विविध पक्ष द्वारे दावे प्रति दावे करण्यात येत आहेत. भारतीय जनता पार्टीने तालुक्यातील एकूण 22 ग्रामपंचायतीवर आपला दावा सांगितला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायत वर आपला दवा केला आहे. तालुक्यातील सर्वच पक्ष ग्रामपंचायत वर आपले दावे सांगत आहेत. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देखील तालुक्यातील राजेगाव व मालेगाव दुधना या ग्रामपंचायतीवर आपला दावा सांगितलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राम शर्मा यांच्या वतीने शहरातील जालना रोडवरील शिवसेना कार्यालयावर राजेगाव व मालेगाव दुधना येथील नव्याने निवडून आलेल्या सरपंचाचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राम शर्मा, नवंनिर्वाचित सरपंच व सदस्य वैजिनाथ सुधाकर कदम (मालेगाव दु.), बाळासाहेब मधूवर (राजेगाव), शहर प्रमुख अरविंद कटारे परमेश्वर ठोंबरे या खूप भाई अशोक शिंदे विठ्ठल राठोड यांच्यासह अदी कार्यकर्ते उपस्थिती होते.