आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नागपूर विधानसभेवर शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर, २०२२ रोजी “महामोर्चा”आयोजित

सहसंपादक/मनोज टाक

विषय: नागपूर विधानसभेवरील शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर, २०२२ रोजीचा “महामोर्चा”, महत्वाच्या सूचना

.नमस्कार मित्रांनो..आम आदमी पार्टी महाराष्ट्रातर्फे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधानसभेवर शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर, २०२२ रोजी “महामोर्चा” आयोजित केला आहे. या मागण्यांची विधिमंडळात चर्चा घडून सकारात्मक निर्णय शासनाने घेणं अपेक्षित आहे. राज्यातील सर्व जिल्हा, तालुका, महानगर आणि शहरातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या “महामोर्चा” मध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हायचे आहे. काही महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे. १. सर्व कार्यकर्ते / पदाधिकारी यांनी शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम, धनतोली येथे सकाळी १० वाजता जमायचे आहे. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था यशवंत स्टेडियम येथे करण्यात आली आहे. २. महामोर्चा दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडियम येथून नागपूर विधानसभेच्या दिशेने निघेसर् ३. सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातून मोर्चासाठी येणाऱ्या सर्व कार्यकर्ते / पदाधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक विभागीय समितीकडे ताबडतोब जमा करावीत. ४. प्रत्येक जिल्हा समितीने आपापल्या जिल्ह्याचा बॅनर बनवून आणणे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते एकत्रपणे आपापल्या जिल्ह्याच्या बॅनर सोबत मोर्चात सहभागी होतील. ६. बाहेर गावाहून २२ तारखेला रात्री नागपूर ला पोहोचणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची राहण्याची सोय नागपूर येथे करण्यात आलेली आहे. पत्ता पुढील प्रमाणे : राजस्थानी महिला मंडळ भवन टेकडी रोड सिताडुलबी नागपूर७. २३ डिसेंबर ला सकाळी लवकर पोहोचणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची फ्रेश होण्याची सोय वरील ठिकाणी करण्यात आली आहे. ८. २३ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत *विभागीय समिती, जिल्हा अध्यक्ष व महानगर पालिका कार्याध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. ९. स्थानिक पोलिसांना पूर्ण सहकार्य करत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा विधानसभेपर्यंत पोहोचेल. अधिक माहितीसाठी विभागीय समितीशी संपर्क साधावा हि विनंती. परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात आले(धनंजय रामकृष्ण शिंदे.आम आदमी पार्टी राज्य सचिव)(परमेश्वर यादव. आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष)(अँड सुरेशराव चौधरी. जिल्हा सचिव आम आदमी पार्टी)(कृष्णा सामाले. तालुका अध्यक्ष परभणी)(वैजनाथराव जोगदंड. आम आदमी पार्टी सोनपेठ)(नामदेव बोबडे. पूर्णा तालुकाध्यक्ष)(बाळासाहेब शिंपले बोरी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *