उदगीर येथे होत असलेल्या सिमेंट रोड कामाची चौकशी मागणी !सा.बां. प्रादेशिक कार्यालया नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ!

उदगीर येथे होत असलेल्या सिमेंट रोड कामाची चौकशी मागणी !सा.बां. प्रादेशिक कार्यालया नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ!शाखा अभियंता देशपांडे व उपविभागीय अभियंता देवकर यांच्या हकालपट्टीची मागणीनांदेड प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील बी.आर.आंदे कॉन्ट्रॅक्शन या कंपनी मार्फत झालेले व चालू असलेले रोड काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने औरंगाबाद विभाग गुण नियंत्रण पथकामार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे दि.19/12/2022 पासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.उपोषणातील मागण्या1) उदगीर येथील शिवाजी चौक ते तोंडारपाटी सिमेंट रोड कामाची चौकशी व्हावी.2) शिरूर ताजबंद ते वायगाव पाटीच्या रोड कामाची चौकशी व्हावी.3) घोणसी ते आतनूर डांबरीकरण रोड कामाची चौकशी व्हावी.4) बी.आर.आंदे कॉन्ट्रक्शन चा परवाना रद्द करून काळया यादीत टाकावे.5) नेहमी वादग्रस्त असणारे उपविभागीय अभियंता लक्ष्मण देवकर उदगीर यांची तात्काळ हकालपट्टी करावी.6) शाखा अभियंता देशपांडे जळकोट यांना तात्काळ निलंबित करावे.7) चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाचे बिल (देयेक) रोखण्यात यावे.या उपोषणात संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी, अल्पसंख्यांक मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम, सविता चप्पलवार, प्रियंका मुद्दामवार, ज्योती वलनंदे, निसार अहेमद, शेख अब्दुल वहाब, मोहम्मद शकील, कासिम जमीनदार, तानाजी भंडे, शेख जुल्फिकार, संजय मुद्दामवार, शेषराव पाटील शेख सैलानी इतर अनेक पदाधिकारी उपोषणात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *