बोरी येथील आज ज्ञानोपासक विद्यालय,2004-2005 या बॅच च्या माजी विध्यार्थ्यांनचा 17 वर्षा नंतर स्नेह मेळावा पारपडला

सहसंपादक/मनोज टाक

बोरी येथील आज ज्ञानोपासक विद्यालय मध्ये 2004-2005 बॅच च्या माजी विध्यार्थ्यांनचा 17 वर्षा नंतर स्नेह मेळाव.पारपडला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माजी मुख्याध्यापक ल.रा. मातणे सर आणि सर्व आदरणीय शिक्षक वृंद- काळे सर, माने सर, आहेर सर, ढोबळे सर, भोसले सर, सेवानिवृत्त शिक्षक देशमुख सर कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय शिक्षक जाधव सर आणि भारती सर होते. सूत्रसंचालन वर्ग मित्र नंदकुमार गिरी यांनी केले तर प्रास्ताविक करुन नांगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती कनकुटे यांनी केले कार्यक्रमाची सुरवात सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले , कार्यक्रमाच्या निम्मित सर्वांच्या भेटी गाठी झाल्या शाळेतील जुन्या आठवणी ना नवीन उजाळा मिळाला, प्रत्येक जण आपापल्या कार्यरत क्षेत्रातील माहिती देत होते खूप दिवसानंतर सर्व जण एक मेकांना भेटणार म्हटल्या वर सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा च आनंद निर्माण झाला होता .आपल्या सर्वांना प्रत्येकाला स्वहतः चे मनोगत मांडायची संधी तशी मिळाली नाही कारण वेळ कमी असल्यामुळे फक्त मोचक्या शब्दात च मनोगत वैक्त करण्यात आले त्यात आपले आदरणीय शिक्षक यांचे मार्गदर्शन झाले, त्यांनी त्यावेळेस ची शिकवणी वर्गातून विद्यार्थ्यांन बद्दल असणारी तळमळ आणि आपुलकीची भावना आज सर्वांन समोर मांडली आज सर्व आपले सर्व वर्ग मित्र आणि मैत्रीणि यांनी आपण कसे होतो आणि आता कसे आहोत याची एकमेकांना जाणीव करून दिली . भूतो न भविष्यता असा हा आपला माजी विद्यार्थी स्नेह भेट मिळावा झालेला आहे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका आरती कणकुटे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन बालाजी कंठाळे, करून नागंरे श्याम भारती, नंदकुमार गिरी, महेश लोखंडे , सचिन भिसे यांनी केले आपल्या सर्व सहकारी वर्ग मित्र मैत्रिणी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली असाच योगायोग पुन्हा यावा स्नेह भेट पुन्हा व्हावी सर्वांना हीच विनंती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *