मा खासदार श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आखाडा बाळापूर येथे विविध सामाजिक कार्यक्रम

हिगोंली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा

माजी कृषी केंद्रीय मंत्री माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद कन्या शाळा आखाडा बाळापूर येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती व आज दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे महिला आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथील डॉक्टर प्रताप दुर्गे बालरोगतज्ञ , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री बाबुराव वानखेडे ,डॉक्टर श्री संतोष बोंढारे ,श्री अभिजीत देशमुख ,यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती सेल महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर सिंग, बावरी शहराध्यक्ष अनिल बोंढारे, विनोद जराड ,बालाजी जाधव, नदीम देशमुख ,शेख युसुफ, अजमत फारुकी ,भारताबाई पानपट्टी, राजेश पाटील, सुरेश घोडके ,सचिन काळे, वैभव गव्हाणे ,विनायक माकने, आत्माराम कोल्हे, शेख नाझीनाबी ,श्रीकांत वाघमारे ,व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि आखाडा बाळापूर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, महिला आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर करिता डॉक्टर प्रतापराव दुर्गे बालरोग तज्ञ, डॉक्टर सचिन जाधव बाळरोग तज्ञ ,डॉक्टर प्रिया नाकाडे मॅडम स्त्रीरोग तज्ञ ,डॉक्टर शिराळे स्त्रीरोग तज्ञ ,डॉक्टर शहनाज शेख नेत्ररोग तज्ञ ,डॉक्टर शिवाजी माने वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर अभिजीत वाघमारे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर एस बी जाधव, कार्यालयीन अधीक्षक डॉक्टर डी आर वळकले ,औषध निरीक्षक अधिकारी डॉक्टर विजय सारंग डी इ ओ हे होते तर वक्तृत्व स्पर्धे साठी जिल्हा परिषद कन्या शाळा खडा बाळापूर येथील श्री जोशी मॅडम श्री शेवाळकर सर श्री मुसळे सर श्री देवकते सर श्री श्रीखंडे सर हे उपस्थित होते या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वर्ग सातवी मधील अनन्या लोणीकर द्वितीय क्रमांक खुशप्रीत कौर बावरी वर्ग चौथा तृतीय क्रमांक गौरी रावते वर्ग पाचवा यांना सन्मानचिन्ह पारितोषिक देऊन गौरविण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती सेल महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूरसिंग बावरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री बाबुराव वानखेडे डॉक्टर सेलचे प्रदेश सचिव डॉक्टर संतोष बोंढारे माजी तालुकाध्यक्ष अभिजीत देशमुख शहराध्यक्ष अनिल बोंढारे बालाजी जाधव विनोद जराड नदीम देशमुख अजमद फारुकी शेख इशूब भारताबाई पानपट्टी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *