बोरी येथे “धन्यवाद मोदीजी अभियान” कार्यक्रम चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गोरं गरीब जनतेला संदेश

सहसपांदक, मनोज टाक बोरी

जिंतूर: तालुक्यातील बोरी येथे बाजार मैदानावर मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोरी या गावचे माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच मा. यशवंतराव चौधरी यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला व्यासपीठावर आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, राहुल लोणीकर, मोहन फड, आनंद भरोसे, डॉ. सुभाष कदम, डॉ. विद्या चौधरी, लक्ष्मण बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. बावनकुळे यांनी पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून देशात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. देशाचा होत असलेला विकास व प्रगती यांचे विश्लेषण केले. या कार्यक्रमात आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मनोगत व्यक्त करताना भाजपाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश खिस्ते, शंकरराव भोंडवे, डॉक्टर पंडित दराडे, चंद्रकांत चौधरी,कृष्णकांत देशमुख, पंडितराव घोलप, अनंतराव चौधरी, शेख वाजेद,संभाजी चौधरी, दिनकर चौधरी, शेख वसीम, गुलाब चौधरी, ओमकार चौधरी,नवनाथ कदम, वामनराव शिंपले, तानाजी चौधरी, सुधाकर संगेकर,पांडुरंग घाटूळ यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *