शेतकऱ्याने लावली गांजाची झाडे ! औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी येथे दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा

हिंगोली – तालुक्यातील गांगलवाडी शिवारात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी शाखेने सदरील ठिकाणावर जाऊन छापा टाकला असता या शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लहान व मोठी अशी एकूण दहा झाडे मिळून आली. सदरील शेतकऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध कार्यवाही बाबत विशेष मोहीम सुरू आहे. हिंगोली दहशतवाद विरोधी शाखा यांना मिळालेल्या माहितीवरून औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी शिवारात नामे सुभाष मारोती दुधाळकर याने त्याच्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची झाडे लावली व त्याची जोपासना व संवर्धन करतो अशी माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीवरून दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने दोन सरकारी पंच व वजन काटा, तलाठी कृषी सहाय्यक यांना सोबत घेऊन नमूद सुभाष मारोती दुधाळकर हा वहीती करत असलेल्या गांगलवाडी शेत गट नंबर 22 मध्ये छापा टाकला असता सदर शेतात शासनाने प्रतिबंधित केलेला गुंगीकारक वनस्पती गांजाची लहान व मोठी दहा झाडे मिळून आली.सदर झाडे उपटून त्यांचे वजन केले असता 3 किलो 570 ग्राम भरले. त्याची किंमत अंदाजे 35 हजार 700 रुपये एवढी असून शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची झाडे मुद्देमाल मिळून आला.घटनास्थळावरून शेतमालक सुभाष मारोती दुधाळकर यास ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात भादविनुसार तसेच कलम 20 (अ) एनडीपीएस कायद्यान्वये आरोपी शेतकरी सुभाष मारोती दुधाळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार शैलेश चौधरी, धनंजय पुजारी, शेख शफीयोद्दीन, अर्जुन पडघन, आझम प्यारेवाले, पवार सर्व दहशतवाद विरोधी शाखा हिंगोली यांनी केली.

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *