शाळेची ट्रिप निघाली अन् मोठा अपघात ! पण… काय नेमकं घडलं?

उप सपांदक अजहर शेख हादगावकर

परभणी:-आपल्या समोर कधी कसलं संकट येऊन उभं ठाकेल याची आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु नशीब बलवंतर असेल तर तुम्ही कुठल्या संकटातून वाचू शकता.सध्या असाच काहीसा प्रकार परभणीत घडला आहे परंतु त्यातही काहींना संकटाचा विपरीत परिणाम भोगावा लागला आहे. परभणीच्या गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या चॅप्लिन इंग्लिश स्कूलची ट्रिप घेऊन निघालेल्या स्कूलबसचा आणि एसटीचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आलेइतर जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सदरील अपघात गंगाखेड सावरगाव रोडवरील खंडाळी गावाजवळ झाला आहे. गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या चॅप्लिन इंग्लिश स्कूलची स्कूल बस आज चाकूर येथील वाटर पार्क दाखविण्यासाठी 20 मूल आणि पालकांना घेऊन जात होते तेव्हा स्कुलबस गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाजवळ आली असता अहमदपूर वरून बुलढाण्याकडे जाणाऱ्या बस बरोबर स्कुल बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी आणि एसटी मधील असे 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे रेफर करण्यात आले आहे, अशी माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *