Breaking newsपिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
https://youtu.be/LnhmnRza2aAhttps://youtu.be/LnhmnRza2aA
भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहाबे आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आज राज्यभर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी शहरातही निषेध आंदोलन करण्यात आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात एका तरूणाने चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. त्यानंतर एकच गोधळ उडाला. दरम्यान, शाई फेकणाऱ्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य केले होते. यावरून आता वातावरण चांगलचं तापलं आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.