धक्कादायक : वाशिममध्ये १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार;
वाशिम तालुक्यातील एका (13 वर्षीय) अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. सततच्या अत्याचारामुळे ही अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दरम्यान या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयीत आरोपी मंगेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेची आई मोलमजुरी करीत असल्याने मुलगी एकटीच घरी राहत होती. त्याचा फायदा घेत संशयीत आरोपीने तीच्यावर अत्याचार केले. दरम्यान मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला दवाखान्यात तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. संशयीत आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलिस करत आहेत.